वैजापूर, (प्रतिनिधी): येथील पचायत समितीच्या १६ जागासाठी ची आरक्षण सोडत विनायकराव पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात लहान मुलीच्या हस्ते चिठ्या टाकून काढण्यात आली.
उपविभागीय अधिकारी डॉ अरुण जन्हाड याच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी तहसीलदार सुनील सावत, नायब तहसीलदार सुरज कुमावत, गणेश चौकडे, रइस शेख, पडीत, गायकवाड याची यावेळी उपस्थिती होती.
१६ जागापैकी ८ जागा महिलासाठी राखीव :
यात अनुसूचित जमाती महिला, अनुसूचित जाती महिलासाठी प्रत्येकी एक जागा राखीव झाली. सर्वसाधारण महितासाठी ४. नागरीकांच्या मागास प्रवर्गातील महिलासाठी दोन जागा राखीव झाल्या. सर्वसाधारण साठी पाच जागा, नागरीकाच्या मागास प्रवर्गासाठी
दोन व अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एक जागा राखीव ठेवण्यात आली.
पंचायत समिती सदस्य सुरेश राऊत याना पुन्हा एकदा सधी मिळणार आहे. प्रभाकर बारसे, विनायक गाढे, मयूर राजपूत याचा गण राखीव झाल्याने त्याची संधी हुकली आहे. सिना मिसाळ यांना पुन्हा संधी मिळणार आहे. गणेश इंगळे, पप्पू लाडे, अजय काकडे, विठ्ठल उमाळे, नदकिशोर जाधव आदीसह अनेक जण पचायत समिती निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.
स्त्री पंचायत समितीचे राखीव गण याप्रमाणे :
वाकला-अनुसुचीत जमाती स्त्री
पोखरी - सर्वसाधारण स्त्री
मनुर-नागरीकाचा मागास प्रवर्ग
बोरसर - सर्वसाधारण स्त्रो
शिवूर - नागरीकाचा मागास प्रवर्ग
खंडाळा - सर्वसाधारण
जरुळ - सर्वसाधारण
सवंदगाव - अनुसुचीत जाती स्त्री
पालखेड - सर्वसाधारण
लासुरगाव सर्वसाधारण स्त्री
घायगाव-सर्वसाधारण
लाहगाव - सर्वसाधारण
वांजरगाव-सर्वसाधारण स्त्री
विरगाव - नागरीकाचा मागास प्रवर्ग स्त्री
महालगाव - अनुसुचीत जाती
नागमठाण - नागरीकाचा मागास प्रवर्ग